RCB vs GT Match Preview: आयपीएल २०२५ च्या हंगामात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स आमने-सामने येणार आहेत. बंगलोरने या हंगामातील सलग दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात त्यांना हॅट्रिक करण्याची संधी असणार आहे. याचबरोबर दुसरीकडे, गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करत या हंगामात पहिला विजय मिळवला होता. या हंगामतील त्यांचा तिसरा सामना असून आजचा सामना जिंकण्याचे ध्येय गुजरातचे असणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने हंगामाच्या सुरुवाती पासूनच विजयायची लय कायम ठेवली आहे. त्यांनी सुरुवातीला गतविजेत्या कोलकाताला पराभूत केले. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सला घरच्या मैदाणावर पराभव करत धूळ चारली. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात त्यांना सलग तिसरा विजय मिळवण्याची संधी आहे. दुसरीकडे, पंजाबकडून पराभव झालेल्या गुजरात टायटन्सने पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सला पराभव करत हंगामात कमबॅक केला.
गुजारत टायटन्सकडे शूबनम गिल आणि साई सुदर्शन ही शानदार सालामी जोडी आहे. त्यामुळे सुरुवातीला आरसीबी त्यांना रोकण्याचा प्रयत्न करेल.आरसीबीचा विचार करता भुवनेश्वर कुमारची स्विंग गोलंदाजी आणि हेजलवुडची अचूकता आरसीबीच्या संघाला विजयासाठी अडचणीत आणू शकते. त्यामुळे आज चिन्हा स्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या सामन्याकडे सर्वाचे लक्ष असणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर