आयपीएल २०२५ च्या हंगामाला आजपासून सुरुवात; बंगळुरू समोर गतविजेत्या कोलकताचे आव्हान

23
IPL 2025 Restart with RCB vs KKR in Bangalore
आयपीएल २०२५ च्या हंगामाला आजपासून सुरुवात

IPL 2025 Restart with RCB vs KKR in Bangalore: भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण वतावरणानंतर आणि आठवड्याभरच्या स्थगितीनंतर इंडियन प्रिमियर लीगचा हंगाम आजपासून पुन्हा एकदा सुरू होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकता हे दोन्ही संघ शनिवारी आमने-सामने येणार आहेत. याशिवाय बंगलोरच्या घरच्या मैदानावर हा सामाना पार पडणार असून कसोटी क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेतलेल्या विराट कोहलीच्या फलंदाजी कडे सर्वाचे लक्ष राहणार आहे.

भारत पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल दिनांक ९ रोजी स्थगित करण्यात आली होती. मात्र, अखेर आज स्पर्धेला पुन्हा सुरुवात होणार असून यंदाच्या हंगामात कोणते संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश करणार याकडे सर्वाचे लक्ष राहणार आहे.बंगलोरच्या संघाने देवदत्त पडीकलच्या कर्णधार पदाखाली ११ सामन्यांमधून ८ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यांना १६ गुणांची कमाई करता आलेली आहे.पॉइंट टेबलचा विचार करता ते सध्या दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यामुळे प्लेऑफच्या पात्रतेसाठी ते सुस्थितीत आहेत. याशिवाय दुसरीकडे गतविजेता कोलकताचा संघ यंदा संघर्ष करताना दिसला. अजिंक्य राहणेच्या नेतृत्वाखाली केकेआरने १२ सामन्यांमधून ५ सामन्यात विजय मिळवत ११ गुण मिळवले आहेत. याचबरोबर गुणतालिकेत ते सध्या सहाव्या स्थानावर आहेत. स्पर्धेतील आव्हान राखण्यासाठी त्यांना उर्वरीत दोन्ही सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य आहे.

काय सांगते खेळपट्टी :

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चिन्नास्वामी स्टेडियमवर वेगवान तसेच फिरकी गोलंदाजाना खूप मदत मिळाली आहे. आठवड्या भरच्या विश्रांतीनंतर आज या मैदानावर पुन्हा सामना रंगणार आहे. बंगलोरमध्ये कालच पावसाने हजेरी लावली होती त्यामुळे खेळपट्टीचा रागरंग आगामी काळात कसा राहणार याकडे सर्वाचे लक्ष असणार आहे.

प्रथमेश पाटणकर, न्यूज अनकट प्रतिनिधी