IPL Auction 2022: कुठल्या संघाकडे किती खेळाडू आणि पर्समध्ये शिल्लक रक्कम किती?

बंगळुरु, 14 फेब्रुवारी 2022 : इंडियन प्रीमियर लीगचा मेगा ऑक्शन बंगळुरूमध्ये दोन दिवस चालला. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी सुमारे 600 खेळाडूंसाठी बोली लावण्यात आली होती, त्यापैकी केवळ 200 हून अधिक खेळाडूंना संघांनी खरेदी केले होते. बंगळुरूमध्ये दोन दिवस चाललेल्या लिलावात खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला.

या हंगामातील लिलावात 15.25 कोटी रुपयांसह यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन सर्वात महागडा विकला गेला. त्याचवेळी दीपक चहर, लियाम लिव्हिंगस्टोन, श्रेयस अय्यर यांसारख्या स्टार्सनाही मोठी किंमत मिळाली.

आता लिलाव संपला आहे आणि आयपीएल 2022 साठी संघ तयार झाले आहेत, कोणत्या संघात कोणता खेळाडू आहे आणि त्यांचा संघ कसा आहे. संपूर्ण माहिती जाणून घ्या…

चेन्नई सुपर किंग्स – एकूण खेळाडू 25 – परदेशी खेळाडू 8 – पर्समध्ये शिल्लक रक्कम – 2.95 कोटी रुपये

दिल्ली कॅपिटल्स – एकूण 24 खेळाडू – सात परदेशी खेळाडू – पर्समध्ये 10 लाख रुपये शिल्लक

केकेआर – एकूण खेळाडू 25 – पाच परदेशी खेळाडू – पर्समध्ये 45 लाख शिल्लक

मुंबई इंडियन्स – एकूण खेळाडू 25 – आठ परदेशी खेळाडू – पर्समध्ये 10 लाख शिल्लक

पंजाब किंग्स – एकूण खेळाडू 25 – सात परदेशी खेळाडू – पर्समध्ये 3.45 कोटी शिल्लक

राजस्थान रॉयल्स – एकूण खेळाडू 25 – आठ परदेशी खेळाडू – पर्समध्ये 95 लाख शिल्लक

आरसीबी – एकूण खेळाडू 22 – आठ परदेशी खेळाडू – पर्समध्ये शिल्लक 1.55 कोटी

SRH – एकूण खेळाडू 23 – आठ परदेशी खेळाडू – पर्समध्ये शिल्लक 10 लाख

लखनऊ सुपर जायंट्स – एकूण खेळाडू 21 – परदेशी खेळाडू सात – पर्समध्ये शिल्लक शुन्य

गुजरात टायटन्स – एकूण खेळाडू 23 – परदेशी खेळाडू आठ – पर्समध्ये शिल्लक 15 लाख

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे