IPL: अखेर SRH ने विजयाची चव चाखली, RR ला 7 विकेट्स ने हरवले

यूएई, 28 सप्टेंबर 2021: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 14 व्या हंगामातील 40 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने राजस्थान रॉयल्सचा (RR) सात गडी राखून पराभव केला. दुबईत खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकांत 4 गडी गमावून 164 धावा केल्या. सनरायझर्सने 163 धावांचे लक्ष्य 18.3 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले.

सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण करताना जेसन रॉयने शानदार अर्धशतक झळकावले. रॉय आणि रिद्धिमान साहा यांनी हैदराबादला झटपट सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 57 धावा जोडल्या. यानंतर, रॉयने कर्णधार केन विल्यमसनसह आणखी अर्धशतकी भागीदारी करत राजस्थानला सामन्यातून बाहेर काढले.
जेसन रॉयने 42 चेंडूत 60 धावा केल्या. त्याने 8 चौकार आणि एक षटकार ठोकले. साहा 18 आणि प्रियम गर्ग शून्यावर बाद झाला. केन विल्यमसन 51 आणि अभिषेक शर्मा 21 धावांवर नाबाद राहिले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 48 धावा जोडल्या. विल्यमसनने 41 चेंडूंचा सामना केला. त्याने 5 चौकार आणि 1 षटकार लावले.

गुणतालिकेत सनरायझर्स हैदराबाद शेवटच्या स्थानावर आहे. या मोसमात त्याचा हा फक्त दुसरा विजय आहे. 10 सामन्यांमध्ये राजस्थानचा हा सहावा पराभव आहे. संघाचे फक्त 8 गुण आहेत. संघ सहाव्या क्रमांकावर आहे. हैदराबादचा 10 सामन्यांतील हा एकमेव दुसरा विजय आहे. त्याला 4 गुण आहेत.

अशी होती राजस्थानची खेळी

तत्पूर्वी, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने अप्रतिम फलंदाजी करताना 57 चेंडूत 82 धावांची खेळी खेळली. सॅमसनने आपल्या डावात 7 चौकार आणि 3 षटकार मारले. सॅमसन व्यतिरिक्त सलामीवीर यशस्वी जयस्वालने 36 धावा केल्या. लॉमर 29 धावांवर नाबाद परतला.
मात्र, शेवटच्या 2 षटकांत राजस्थानच्या संघाने अत्यंत खराब खेळ केला आणि 12 चेंडूत 11 धावा केल्या. हैदराबादचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने शेवटच्या षटकात 4 धावा देऊन 2 गडी बाद केले. ज्यात संजू सॅमसन आणि रियान परागच्या विकेट्सचा समावेश होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा