‘आयपीएल’साठी आता पाच पंच

मुंबई : आगामी वर्षात अर्थात २०२० साली होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी आता पाच पंच नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२०१९ च्या आयपीएल सामन्यांत नो बॉलमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपरकिंग्ज या संघाची हार झाली होती. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या ‘बीसीसीआय’च्या प्रशासकीय परिषदेत नो बॉलच्या मुद्यावर चर्चा झाली.
या बैठकीत आता आगामी आयपीएल सामन्यांमध्ये फ्रंट फूटवरील नो बॉल पाहण्याची जबाबदारी तिसऱ्या पंचांवर असेल असे ठरले आहे.
याचबरोबर आगामी ‘आयपीएल’मध्ये फक्त नो बॉलवर लक्ष ठेवण्यासाठी आणखी एक पंच नेमण्यात येणार आहे.
दरम्यान, भारत-बांगलादेशदरम्यान झालेल्या दिवस-रात्र कसोटीत नो बॉलवर लक्ष ठेवण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर एक पंच नेमण्यात आला होता. या प्रयोग यशस्वी झाल्याने आयपीएलमध्ये देखील हि प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा