दुबई, १५ सप्टेंबर २०२०: जगभरातील प्रसिद्ध क्रिकेट लीग आयपीएल यंदा कोरोनाचे सावट जगभर असल्यामुळे उशिरा सुरू होत आहे. आयपीएलमध्ये जगभरातील प्रसिद्ध खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळतात. तसेच यंदाचे आयपीएल सत्र हे दुबईमध्ये रंगणार आहे.
येत्या १९ सप्टेंबर २०२० पासून आयपीएलचा प्रारंभ होणार आहे. १३ व्या सत्राचे प्रक्षेपण १२० देशांमध्ये केले जाणार आहे. तसेच स्टार इंडियाकडे प्रक्षेपणाचे मूलभूत हक्क आहेत. भारतात हिंदी आणि इंग्लिश व्यतिरिक्त स्थानिक भाषांमध्ये ही प्रक्षेपण होणार आहे. यात तामिळ, तेलुगू ,कन्नड , बांगला, मल्याळम आणि मराठी या भाषेचा समावेश आहे.
या सामन्यांचा अनुभव प्रेक्षक वर्ग हॉटस्टार वरही घेऊ शकतील. परंतु यासाठी त्यांना प्रीमियम मेंबरशीप असणे गरजेचे आहे. तसेच यूके – आयर्लंडमध्ये स्काई स्पोर्ट्स, अमेरिका – कॅनडा मध्ये विलो टीव्ही या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया – न्यूझीलंड या देशातील प्रेक्षक आयपीएलचे सामने फॉक्स स्पोर्ट्स यावर पाहू शकतील.
पाकिस्तान मधील प्रेक्षकांना आयपीएलच्या लाईव्ह प्रक्षेपणाचा लाभ घेता येणार नाही आहे. तसेच अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशात प्रक्षेपणाबाबत स्टार स्थानीय ब्रॉडकास्टर्स सोबत चर्चा करणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे