पणजी, १० ऑगस्ट २०२३ : गोव्यात एका पबमध्ये सलगी करण्याचा प्रयत्न करत गैरवर्तन करणाऱ्या एका आयपीएस अधिकाऱ्याच्या कानाखाली युवतीने वाजवली. कळंगुटमधील एका पबमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक डॉ.ए.कोन यांना त्यांच्या पदावरुन हटवण्यात आले आहे.
आयपीएस अधिकारी डॉ.ए.कोन यांना पोलीस महासंचालकांना रिपोर्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पुढील कारवाई केली जाणार आहे. या घटनेनंतर डॉ.ए.कोन यांच्याकडून पोलीस उपनिरीक्षक पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे.
दरम्यान, आयपीएस अधिकाऱ्यांने कळंगुटमधील पबमध्ये महिलेशी गैरवर्तन केल्याचा मुद्दा गोवा विधानसभेमध्ये उपस्थित झाला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे आश्वासन सभागृहात दिले होते. त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर