इराण राष्ट्रपती निवडणूक: कट्टरपंथी नेते इब्राहिम रईसी यांचा मोठा विजय

तेहरान, २० जून २०२१: कट्टरपंथी नेते इब्राहिम रईसी यांनी शनिवारी इराणमधील राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली. ते देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचे कट्टर समर्थक आणि निकटवर्तीय मानले जातात. इब्राहिम रईसी इराणचे सर्वोच्च न्यायाधीश आहेत आणि ते अति-पुराणमतवादी विचारांचे व्यक्तिमत्त्व मानले जातात. २०१९ मध्ये त्यांची इराणच्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. सर्वोच्च नेत्यानंतर इराणचे राष्ट्रपती देशातील दुसर्‍या क्रमांकाचे अधिकारी मानले जातात.

असे मानले जाते की यावेळी अध्यक्षीय निवडणुकीत इराणच्या इतिहासातील सर्वात कमी मतदान झाले. प्राथमिक निकालानुसार इब्राहिम रईसी यांना एक कोटी ७८ लाख मते मिळाली. निवडणुकीच्या शर्यतीत एकमेव मध्यम उमेदवार असलेल्या अब्दुलनासीर हेममती हे खूप मागे राहिले. तथापि, खमेनेई यांनी इब्राहिम रईसींचा सर्वात मजबूत विरोधक अपात्र ठरविला. यानंतर इब्राहिम रईसी यांनी हा मोठा विजय मिळविला.

निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे केले जाहीर

इब्राहिम रईसी यांच्या उमेदवारीमुळं इराणमधील मतदार मतदानाकडं उदासीन असल्याचं दिसून आलं आणि माजी कट्टर राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांच्यासह बर्‍याच लोकांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, इराणच्या गृह मंत्रालयाच्या निवडणूक मुख्यालयाचे प्रमुख जमाल ओर्फ यांनी सांगितलं की प्राथमिक निकालांमध्ये रेवोल्यूशनरी गार्डचे माजी कमांडर मोहसिन रेझाई यांनी ३३ लाख मतं जिंकली आणि हेम्माती यांना २४ लाख मतं मिळाली. अन्य उमेदवार अमीरुसेन गाझीदादा हाश्मी यांना १० लाख मतं मिळाली.

आधीच पराभव स्वीकारला

उदारमतवादी उमेदवार आणि इराणच्या सेंट्रल बँकेचे माजी प्रमुख हेम्माती आणि माजी रेवोल्यूशनरी गार्ड कमांडर मोहसीन रेजाई यांनी इब्राहिम रईसी यांचं अभिनंदन केलं. शनिवारी पहाटे हेम्माती यांनी इंस्टाग्रामच्या माध्यमातून इब्राहिम रईसी यांचं अभिनंदन केलं. त्यांनी लिहिलं, ‘मला आशा आहे की तुमचं प्रशासन इराणच्या इस्लामिक गणराज्याला अभिमान वाटणे योग्य असेल. महान राष्ट्र इराणच्या लोकांचं जीवन आणि अर्थव्यवस्था सुधारेल.’

निवडणुकीच्या सुरुवातीला उमेदवारानं पराभवाचा स्वीकार करणं इराणच्या निवडणुकांमध्ये नवीन गोष्ट नाही. इब्राहिम रईसी यांनी प्रत्येक परिस्थितीवर नियंत्रण ठेवत विजय मिळवल्याचं हे लक्षण आहे. काही लोकांनी या निवडणुकांवर बहिष्कार टाकला आहे. यावेळी २०१७ च्या मागील निवडणुकीपेक्षा मतदानाची टक्केवारी खूपच कमी होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा