शरद पवारांबद्दल बोलण्याची लायकी आहे का ? : जितेंद्र आव्हाड

मुंबई, दि. २४ जून २०२०: शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निषेध व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनी सोबत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी असे म्हटले आहे की शरद पवारांबाबत केलेल्या या वक्तव्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील.

आपली प्रतिक्रिया देताना दरम्यान त्यांनी असे म्हटले की केवळ प्रसिद्धीसाठी असे शरद पवारांविषयी वाईट वक्तव्य करणे योग्य नाही. हे सांगत असताना त्यांनी अतिशय तीव्र निषेध नोंदवत म्हणाले की “शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हसण्यासारखं आहे. केवळ प्रसिद्धीच्या वर्तुळात राहण्याचा हा असहाय्य प्रयत्न आहे. शरद पवारांबद्दल बोलण्याची लायकी आहे का त्यांची. जो माणूस कालपर्यंत मोदींना शिव्या देत होता, तो त्यांच्याकडूनच उमेदवारी घेतो. भाजपात जाऊन बहुजनांच्या गोष्टी आम्हाला शिकवताय. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला शरद पवारांनी इथपर्यंत आणलं आहे.”

गोपीचंद पडळकर यांना इशारा देत ते म्हटले की, “असे अनेक गोपीचंद महाराष्ट्रात झाले आहेत. पवारांच्या उंचीलाही ते स्पर्श करु शकत नाहीत. शरद पवारांवर बोलताना जी भाषा वापरली आहे त्याचा मी तीव्र निषेध करतो. त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल.” यादरम्यान त्यांनी एक गौप्यस्फोट करत म्हटले की, सात-आठ महिन्यांपूर्वी गोपीचंद पडळकर माझ्याकडे आले होते व मला राष्ट्रवादीमध्ये घ्या अशी विनंती करत होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा