गोल पोस्ट स्पॉटलाइट क्रीती सेनन ‘बाहुबली’ फेम प्रभासला करतेय डेट?

क्रीती सेनन ‘बाहुबली’ फेम प्रभासला करतेय डेट?

मुंबई,२२ सप्टेंबर २०२२ : बॉलीवूडची अभिनेत्री क्रीती सेनेन आणि बाहुबली सुपरस्टार प्रभास यांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. क्रिती ही भाऊबली स्टार प्रभास सोबत रिलेशनशिप मध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

क्रिती सेनन आणि प्रभास लवकरच ‘आदिपुरुष’ या सिनेमात एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची शूटिंगही पूर्ण झाली. दरम्यान या दोघांच्या नव्याकोऱ्या सिनेमाविषयी अपडेट येण्याआधीच त्यांच्या रिलेशनशिपविषयी चर्चांना उधाण आले आहे.

खरंतर हे करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’ या शोमध्ये आल्यानंतर क्रीतीने प्रभासला कॉल केला होता. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं आहे.

काही मीडिया रिपोर्टनुसार ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या सेटवर पहिल्या दिवसापासूनच या दोघांमध्ये चांगले बाँडिग पाहायला मिळाले. तसा लाजाळू असणारा प्रभास क्रीतीशी दिलखुलास बोलत असल्याने अनेकांना आश्चर्यही वाटलं. ‘आदिपुरुष’ च शूटिंग संपून दीड महिना ओलांडला असूनही दोघे अजूनही एकत्र आहेत.

दरम्यान या दोघांमध्ये मैत्रीपलीकडे नाते असल्याचे बोलले जात आहे. या शिवाय चाहत्यांनाही या दोघांना एकत्र पाहायचं आहे. मात्र क्रीती किंवा प्रभास यांच्यापैकी कोणीही स्पष्टपणे नात्याची कबुली अजुन तरी दिलेली नाही.

मोठ्या पडद्यावर प्रभास आणि क्रीतीची नवीन जोडी पाहणे चाहत्यांसाठी खूपच रोमांचक असणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे. क्रीती आणि प्रभास यांच्यासह अभिनेता सैफ अली खान हा देखील या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी २०२३ मध्ये चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version