गोल पोस्ट इतर इतिहास थोर पुरुषांच्या यादीत छ. संभाजी महाराजांचा उल्लेख करा : अमोल कोल्हे

थोर पुरुषांच्या यादीत छ. संभाजी महाराजांचा उल्लेख करा : अमोल कोल्हे

मुंबई, दि. १३ मे २०२०: छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख महापुरुषांच्या यादीत नसल्यामुळे नाराज झालेल्या डॉ. अमोल कोल्हेंनी ट्वीट करत याकडे सरकाराचं लक्षं वेधलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा नामोल्लेख महापुरुषांच्या दिनविशेष यादीत नसल्याने ते अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या या स्वराज्याला छत्रपती संभाजी महाराजांनी टिकवून ठेवले. इतकेच नाही तर त्यासाठी आपले बलिदान देखील दिले. मरणोत्तर देखील लोकांच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. त्यांची उद्या जयंती देखील आहे. या योगाने अमोल कोल्हे यांनी असे ट्विट केले.

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे अभिनेते असून त्यांनी छोट्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही महापुरुषांच्या भूमिका साकारल्या होत्या. अमोल कोल्हे यांच्या दोन्ही भूमिका प्रचंड गाजल्या होत्या. तसेच या दोन्ही भूमिका प्रक्षेकांनीही डोक्यावर घेतल्या होत्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version