माढा दि.१४ऑक्टोबर २०२० :माढा तालुक्यातील कोंडारभागातील आलेगाव खुर्द ते गारअकोले हा रस्ता पूर्णपणे पावसाच्या पाण्यामुळे वाहुन गेला आहे.यामुळे आलेगाव खुर्द व गारअकोले या गावाबरोबरच रूई,आलेगाव बुद्रुक या गावातील लोकांचे अकलूजकडे जाण्या-येण्यासाठी खूप वाईट हाल होत आहेत पाण्यात रस्ता की रस्त्यात पाणी हेच समजेना अशी परिस्थिती झालेली आहे.
गेली तीन दिवस झाले मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे फक्त एकच वाहन बसेल एकच गाडी बसेल असा रस्ता राहिलेला आहे.काही ठिकाणी तर रस्त्याच्या वरील भागातील शेतकरी सगळे पाणी रस्त्यावर काढून देतात त्याच्यामुळे पाणी आले तर लोकांची आवस्था फार वाईट होते.याच गारअकोले गाव ते इंदापूर तालुक्यातील गणेशवाडी या दोन गावांना जोडणारा भीमानदीवर मोठा पुल असून या पुलावरून खूप मोठी वाहनांची वर्दळ असते अकलूज व बावडा सराटी या ठिकाणी शिक्षणासाठी स्कूल बसेस व बाजारासाठी व्यवसायसाठी खूप वाहने दिवसभर वाहतात परंतू वेळोवेळी प्रशासनास सांगूनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही.येथील पुलाचे अथवा पुलाच्या कडेची संरक्षक कठडे सुध्दा नसल्याने एखाद्या दिवशी खुप मोठा अनर्थ होणार आहे. या पुलाच्या कडेची जागा पूर्णपणे खचलेली आहे त्यामुळे लोकांना जाण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो. यारोडचा सोळा गावे वापर करतात परंतू गेली वीस वर्षे झाली हा रोड पुर्णपणे कधी झालाच नाही कधी पाच किलोमीटर तर कधी आठ किलोमीटर आशा पध्दतीने या रोडचे काम झाल्याने या भागातील दळणवळणाची सुविधा खूप खडतर झाली आहे.प्रत्येक वेळी प्रशासनाकडे तक्रार करूनही आजपर्यंत कोणतेही काम रोड बाबत झालेले नाही.
आलेगाव खर्द हे माझे गाव असून आम्हांला अनेक लोकप्रतिनिधीनी विलेक्शन आले की रस्ता आम्ही पुर्ण करणार अशी आनेक वेळा आश्वासन देऊन मते लाटतात व मतदान झाले की विसरून जातात आम्ही याआगोदर लोकसभा व विधानसभा या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता.परंतू त्याही वेळी फक्त आश्वासन देऊन संपूर्ण गावा देखत दिलेले आश्वासन पाळले नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील