कोल्हापूर १६ डिसेंबर २०२३ : विकास संकल्प रथ म्हणजे भाजप चा पर्सनल अजेंडा आहे का? या रथावर तिरंगा आणि भारत सरकार चा उल्लेख का नाही? असे प्रश्न शासकीय अधिकाऱ्याला विचारणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील एका तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. सरकारने राबवलेल्या विविध योजना हे तळागाळातील जनते पर्यंत पोहचवली गेली पाहिजे. या उद्देशाने हा रथ कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात पोहचला असता, तेथील एका तरूणाने रथा सोबत आलेल्या सरकारी अधिकार्याला चांगलेच धारेवर धरून चक्क गावातून हाकलून लावले. या युवकाचे नागरिकांकडुन कौतुक होताना दिसत आहे.
गावोगावी फिरणारा केंद्र सरकारचा विकास संकल्प रथ अडवून राजवैभव या तरूणाने भोंगळ प्रशासनाला आणि राजकीय नेत्यांना जाब विचारला आहे. या तरुणाने रथावर असणाऱ्या स्लोगन्स, चित्रे, व्हिडीओ आणि इतर माहितीबाबत अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न विचारले, परंतु त्याच्या एकाही प्रश्नाचे समाधान कारक उत्तर अधिकाऱ्याला देता आले नाही.
राजवैभव चे प्रश्न
- विकास संकल्प रथावर तिरंगा झेंडा आणि भारत सरकारचा उल्लेख का नाही?
- हे सरकार भारत देशाचे आहे का मोदींचे सरकार आहे?
- संपुर्ण रथावर मोदी सरकार लिहिले आणि भाजप पक्षाच्या झेंड्यासारखी रंगसंगती का आहे?
- गॅसच्या किंमती खरंच कमी झाल्या आहेत का आणि १००% लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचली आहे का?
- सगळ्या योजना भारत सरकारच्या असताना, मोदी सरकार का लिहिता?
- आख्ख्या देशात विकास संकल्प रथ फिरतोय याची गरज काय? त्याचा खर्च किती आणि कोण करतंय?
माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या नाहीतर हा रथ आम्ही इथेच अडवुन ठेवू, अशी भूमिका या तरुणाने घेतल्यानंतर अधिकाऱ्यांकडून घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. तसेच या घटनेची वार्ता लगेच वायरल झाल्याने या ठिकाणी भाजप चे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आले आणि त्यांनी आमचा रथ का अडवला अशी विचारणा या तरुणाकडे करून दमदाटी केल्याची माहितीही समोर येत आहे.
न्युज अनकट प्रतिनीधी : आत्माराम पाटील