इस्लामाबाद: पाकिस्तानात आझादी मार्च शुक्रवारी राजधानी इस्लामाबादमध्ये दाखल झाला. जमियत उलेमा-ए-इस्लाम फजलचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांच्या नेतृत्वात आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारची नमाज अदा केली. यानंतर फजलुर रहमान यांनी इम्रान खान सरकारविरोधात रॅली केली. यात पाकिस्तान पीपल्स पक्षाचे बिलावल भुत्तो, पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजचे प्रमुख शहबाज नवाज यांच्यासह सर्व प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाग घेतला. इस्लामाबादला आझादी मार्चमध्ये तीन लाखांपेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला. फजलुर रहमान यांनी २७ ऑक्टोबरला सिंध प्रांतातील कराचीहून आझादी मार्चला सुरुवात केली आहे. आंदोलकांनी इम्रान खान यांच्यावर २०१८ च्या निवडणुकीत गडबड केल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
बिलावलने सांगितले- पद सोडण्याची वेळ आल्याचे इम्रान यांनी लक्षात घ्यावे
पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो शुक्रवारी पेशावरमध्ये विरोधी पक्षांनी काढलेल्या सरकारविरोधी मार्चमध्ये सामिल झाले. बिलावल यांनी यावेळी सांगितले की, आम्ही झुकणार नाहीत. पंतप्रधांनाना पद सोडण्याची वेळ आल्याचे सांगण्यासाठी एकत्र आलो आहोत.
शाहबाज म्हणाले- खोट्या सरकारपासून मुक्ती मिळवायची वेळ आलीय
पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी आझादी मार्चमध्ये मार्गदर्शन करताना सांगितले की, खोट्या सरकारपासून मुक्ती मिळवायची वेळ आली आहे. इम्रान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत हटणार नाहीत.