गोल पोस्ट गुन्हा इस्लामपुरातील नगरसेविकाच्या पतीवरील हल्ला प्रकरण, तिघेजण ताब्यात

इस्लामपुरातील नगरसेविकाच्या पतीवरील हल्ला प्रकरण, तिघेजण ताब्यात

सांगली; २७ जूलै २०२२: सांगलीच्या इस्लामपूर येथील शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रतिभा शिंदे यांचे पती शिवकुमार दिनकर शिंदे यांच्यावर लोखंडी गजाने हल्ला झाला. या प्रकरणी तिघा संशायितांना इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
या हल्लाप्रकरणी शिंदे गटाचे तालुकाप्रमूख सागर मलगुंडे याच्यासह त्याच्या सहा साथीदारांवर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे गटात सामील व्हा, म्हणून हल्ला केल्याचा आरोप नगरसेविका प्रतिभा शिंदे यांनी केला होता.
शिवकुमार हे सोमवारी सकाळी दूध घेऊन मोटारसायकलवरुन घरी निघाले होते. रस्त्यादरम्यान संशयित मलगुंडे व त्याचे साथीदार दबा धरुन बसले होते. त्यांनी शिवकुमार याना लोखंडी गजाने मारहाण केली.

त्यांच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सूरु आहेत. पोलिसांनी मंगळवारी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून अन्य संशयितांचा शोध सूरु आहे. सभागृहाचा कार्यकाल संपत आल्यानंतर शहाराचे ईश्र्वरपूर असे नामकरण करण्याची मागणी शिवसेनेने केली होती.

या नामांतराचा ठराव घेण्यासाठी बोलविण्यात आलेल्या पालिकेच्या सभेला नगरसेविका शिंदे या गैरहजर होत्या. तेव्हापासून त्यांचे शिवसेशी बिनसल्याची चर्चा होती.याच कारणावरुन हा हल्ला केल्याचा संशय होत आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version