इराणचे परमाणु केंद्र इस्राईलने केले नष्ट

इराण, दि. ४ जुलै २०२० : इस्त्राईल आणि इराण यांच्यातील सायबर हल्ला शिगेला पोहोचला आहे. ताज्या घटनेत इस्रायलने मोठ्या प्रमाणात सायबर हल्ला केला आणि इराणच्या अणु अड्ड्यांमध्ये दोन सायबर स्फोट केले. या मध्ये एक युरेनियम संवर्धन केंद्र आणि दुसरे क्षेपणास्त्र उत्पादन केंद्र आहे. एवढेच नव्हे तर यापुर्वी इस्त्राईलने आपल्या प्राणघातक एफ -३५ लढाऊ विमानाच्या मदतीने इराणच्या पर्चिन भागात क्षेपणास्त्र निर्माण जागेवर हल्ला करून ती जागा नष्ट केली.

कुवैती वर्तमानपत्र अल्जाझीरच्या वृत्तानुसार गेल्या आठवड्यात ही घटना घडली आहे. वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार इजराइलच्या गुरुवारी झालेल्या सायबर हल्ल्यामध्ये इराणमधील नतांजला आग लागली आणि मोठा विस्फोट झाला. हे संपूर्ण केंद्र भूमिगत बनलेले आहे. इस्त्रायली हल्ल्यानंतर इराणचा आण्विक कार्यक्रम आता दोन महिने मागे गेला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अल्जाझीरा ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या शुक्रवारी इस्राईलच्या एफ -१६ स्टिल्ट फाइटर जेटने पर्चिन भागात इराणच्या एका ठिकाणावर छापा टाकला आणि कित्येक बॉम्ब खाली टाकले. हे क्षेपणास्त्र उत्पादन केंद्र असल्याचे सांगण्यात येत आहे. वस्तुतः इस्त्राईल म्हणतो की इराण सतत आपली शस्त्रे आणि क्षेपणास्त्रांची श्रेणी सुधारित करत आहे आणि यहुदी-विरोधी हिज्बुल्लाला पुरवत आहे.

इजराइल ने सध्या या दोन्ही कारवायांची पुष्टी केली नाही परंतू असेही सांगण्यात येत आहे की याआधी एप्रिल महिन्यामध्ये इराणने इस्राईलच्या पाणी पुरवठा विभागाला हॅक करण्याचा प्रयत्न केला होता. इराणने केलेल्या या सायबर हल्ल्याला इस्राईलच्या सायबर डिफेन्स विभागाने निष्क्रिय केले होते. जर इराण आपल्या या हेतू मध्ये यशस्वी झाला असता तर इजराइल मधील पाणी साठ्यामध्ये क्लोरिनची मात्रा जास्त झाली असती परिणामी इस्राईलमध्ये पाण्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला असता.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा