इस्त्रायली दूतावास स्फोट: दोन संशयितांचा फोटो जाहीर, एनआयए कडून १० लाखांचे बक्षीस जाहीर

नवी दिल्ली, १६ जून २०२१: काही महिन्यांपूर्वी देशाची राजधानी दिल्लीमध्ये इस्राईल दूतावासाशेजारी झालेल्या स्फोटात दोन संशयितांचा हात असल्याचे चित्र समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ही छायाचित्रे समोर आली आहेत. एनआयएने या दोघांच्या अटकेसंदर्भात माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

छायाचित्रात दोन संशयित दिसत आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावर मास्क होते. २९ जानेवारी २०२१ रोजी इस्त्रायली दूतावासाच्या बाहेर आयईडीचा स्फोट झाला. या छायाचित्रात दोन संशयित बॉम्ब लावताना दिसत आहेत. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआयए) करीत आहे. विशेष सेल प्रथम या प्रकरणाची चौकशी करत होता, त्यानंतर हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. या स्फोटाशी संबंधित अहवाल रोहिणी एफएसएलने एनआयएला सादर केला आहे. ज्यामध्ये असे सांगितले गेले आहे की हा स्फोट कमी तीव्रतेचा होता.

आयपीसीच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटकही करण्यात आली आहे. दूतावासाच्या आजूबाजूच्या आणि मार्गांवर अनेक खास सीसीटीव्ही चे फुटेज खास सेलने स्वतः स्कॅन केले होते. नवी दिल्ली येथील इस्त्रायली दूतावासाशेजारी झालेल्या स्फोटांना इस्रायलने दहशतवादी हल्ला म्हणून संबोधले होते.

२९ जानेवारी रोजी भारत आणि इस्रायलमधील २९ वर्षांची मुत्सद्दी मैत्री पूर्ण झाली होती. २९ तारखेलाच एक बीटिंग रिट्रीट देखील होते आणि स्फोट करण्याची वेळ ५.०५ मिनिटे होती. ही ती वेळ होती जेव्हा राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बीट रिट्रीट सोहळ्यासाठी विजय चौकात पोहोचले होते. असं म्हणतात की ही एक प्रकारे मोठी भीती पसरविण्याची योजना होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा