इजराइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना देण्यात आली कोरोनाची लस

इजराइल, २० डिसेंबर २०२०: इजराइल चे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शनिवारी कोरोनाव्हायरस पासून बचाव करणारी लस घेतली. ही लस देत असतानाचे प्रसारण थेट टीव्हीवर करण्यात आले. कोरोना ची लस घेणारे ते इजराइल मधील पहिले व्यक्ती ठरले आहेत. याचबरोबर ते जगातील अशा मोजक्याच नेत्यांमध्ये सामील झाले आहे ज्यांनी ही लस घेतली आहे.

महत्त्वाचं म्हणजे इजराइल आज पासून आपल्या स्वास्थ्य कर्मचाऱ्यांना तसेच नर्सिंग होम मध्ये राहणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देखील लसीकरण करण्यास सुरुवात करणार आहे. बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितलं की, ते स्वतः लस घेऊन याबाबत उदाहरण देऊ इच्छित आहे. जेणेकरून ते लोकांनादेखील लस घेण्यासाठी प्रेरित करतील.

बेंजामिन नेतन्याहू यांनी काल फायझर कोरोना लस घेतली. यानंतर त्यांनी काही काळ या लस बाबत कोणते दुष्परिणाम त्यांच्यावर दिसून येतात का याची वाट देखील पाहिली. फायझर लस घेतल्याने अनेक जणांवर साईड-इफेक्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे.

शीबा मेडिकल सेंटर येथे आपल्या डाव्या हातावर त्यांनी कोरोना लस घेतली. यानंतर काही काळ ते तेथेच थांबले. यानंतर त्यांनी आपला आनंद व्यक्त करत असं म्हटलं की, या लसीकरणाच्या कार्यक्रमानंतर इजराइल पुन्हा एकदा आपल्या पूर्वस्थितीत येईल व सर्व काही व्यवस्थित होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा