गोल पोस्ट आरोग्य आयटी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’

आयटी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’

पुणे : पुण्यात कोरोनाचे रूग्ण आढळळ्याने संपूर्ण पुण्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनामुळे पुण्यातील आयटी कंपन्यांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ च्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर येऊ लागली आहे.
संबंधित रुग्ण नुकतेच दुबईला जाऊन आल्याचीही माहिती मिळत आहे. या रुग्णांना तातडीने नायडू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांना विलगीकरण कक्षामध्ये दाखल करुन तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.
दरम्यान, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका सगळ्यांनी काळजी घ्या. या संपूर्ण परिस्थितीला सामोरे  जाण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version