गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे कोंढाव्यात युवकाला ११ व्या मजल्यावरून फेकले

कोंढाव्यात युवकाला ११ व्या मजल्यावरून फेकले

पुणे : पैशावरुन झालेल्या वादातून एका युवकाला ११ व्या मजल्यावरुन ढकलून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली आहे.  या प्रकरणात कोंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर चिलवेरी (वय २४) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकातील पूल हौंसिग या इमारतीतील ११ व्या मजल्यावर चिलवेरी कुटुंब राहतात.
आरोपीकडून १० टक्के व्याजाने पैसे घेतले होते. आरोपी पैसे मागण्यासाठी चिलवेरी यांच्या घरी आला होता. पैशावरुन दोघांमध्ये वाद सुरू झाला.
या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. यावेळी आरोपीसोबत आणखी दोघेजण होते. यावेळी पैसे न दिल्याच्या रागात आरोपींनी चिलवेरीला ११ व्या मजल्यावरुन ढकलून दिले.
यामध्ये सागरचा मृत्यू झाला. या प्रकरणात कोंढवा पोलिसांकड़ून पुढील तपास केला जात आहे. या प्रकरणात कोंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version