अखेर तो बरसला ! पुण्यात सकाळपासून पावसाला सुरुवात, ४८ तास पावसाचा जोर कायम राहणार

पुणे, २ सप्टेंबर २०२३ : पुणे शहरात आज हलक्या पावसाच्या सरी बरसल्या आहेत. आज पहाटेपासूनच पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात पावसाळा सुरुवात झाली आहे. महिन्याभराच्या कालावधीनंतर आज पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहिला मिळालं. काल हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला होता.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. त्यामुळे शहरात आगामी ४८ तास पावसाचा जोर राहील. शुक्रवारी रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली. पुणेकरांची पहाट उजाडली ती पावासानेच, पहाटे सहाला सुरू झालेला पाऊस अजून सुरुच आहे.

पुणे शहरातील बिबवेवाडी, कोथरूड, पेठ परिसर, एनआयबीएम, शिवाजीनगर, हडपसर या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच पिंपरी चिंचवड, मोशी आणि मावळ तालुक्यातही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा