चीन बाबत संरक्षण मंत्र्यांच्या विधानावरून स्पष्ट होते की, मोदींनी देशाची दिशाभूल केली: राहुल गांधी

नवी दिल्ली, १६ सप्टेंबर २०२०: चीनबरोबर सुरू असलेल्या संघर्षाबाबत सरकारनं आपली भूमिका मांडली आहे. मंगळवारी संसदेत संरक्षणमंत्र्यांनी सांगितलं की चीननं एलएसी आणि अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात सैन्य आणि दारुगोळा जमा केला आहे, परंतु भारतीय सैन्यही धैर्यानं उत्तर देण्यास तयार आणि सक्षम आहे. संरक्षण मंत्र्यांनी संसदेत चीनविषयी सांगितलेल्या सद्य परिस्थितीनंतर काँग्रेस आक्रमक आहे.

काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी चिनी सैन्याच्या घुसखोरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरूद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे . प्रत्यक्षात पंतप्रधान मोदींनी गलवान घटनेनंतर सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं की कोणीही आमच्या हद्दीत प्रवेश केला नाही किंवा कोणीही भू क्षेत्राचा ताबा घेतला नाही. या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताला शांतता आणि मैत्री हवी आहे, परंतु ते आपल्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणार नाही.

चीनचं नाव घेण्यास घाबरू नका

त्याचवेळी राहुल गांधी म्हणाले आहेत की, पंतप्रधानांनी चिनी अतिक्रमणावरून देशाची दिशाभूल केल्याचं संरक्षणमंत्र्यांच्या विधानावरून स्पष्ट झालं आहे. आपला देश नेहमीच भारतीय सैन्याबरोबर उभा राहिला आहे आणि असेलच पण मोदी, चीनच्या विरोधात तुम्ही कधी उभे राहाल? आपल्या देशाची जमीन चीनकडून परत कधी घेणार? चीनचं नाव घेण्यास घाबरू नका.

सुरजेवाला यांनीही सरकारला घेराव घातला

यापूर्वी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस रणदीप सुरजेवाला म्हणाले होते की देश सैन्यासह एकजूट आहे, परंतु चीननं आमच्या जमिनी ताब्यात घेण्याचे धैर्य कसे केलं हे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. आपल्या प्रदेशात घुसखोरी न करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची दिशाभूल का केली? असे ही ते म्हणाले .

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा