हैदराबाद, २९ जानेवारी २०२१: एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी अयोध्येत मशिद बनवण्याबाबत निवेदन दिले आहे. अयोध्येत ५ एकर जागेवर बांधल्या जाणाऱ्या मशिदीत जर कोणी नमाज पठण केले तर ते ‘हराम’ मानले जाईल असे ओवेसी यांनी म्हटले आहे. अशा मशिदीत नमाज करणे आणि वर्गणी देणे या दोन्ही गोष्टींना हराम म्हंटले आहे. ओवैसी अयोध्येत धन्नीपुरात बांधल्या गेलेल्या मशिदीच्या तत्त्वांच्या विरोधात आहे.
ओवेसी यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त करताना मशिदी ट्रस्टने या विधानाचे राजकीय अजेंडाशी निगडित वर्णन केले आहे. वास्तविक, असदुद्दीन ओवैसी २६ जानेवारी रोजी कर्नाटकच्या बिदरमध्ये ‘सेव्ह कोन्स्टिट्युशन सेव्ह इंडिया’ कार्यक्रमात बोलत होते. या वेळी त्यांनी सांगितले की जे लोक बाबरी मशिदीच्या बदल्यात ५ एकर जागेवर मशिदी बांधत आहेत, प्रत्यक्षात ती ‘मशिदी’ नसून ‘मस्जिद-ए-झिरार’ आहे. अशा मशिदीत नमाज करणे हराम आहे.
भाजपवर निशाणा साधत एआयएमआयएम प्रमुख म्हणाले की, हे लोक मोदींच्या भक्तीत मग्न आहेत. गांधींना सावरकर आणि गोडसे घाबरत होते. आंबेडकरांच्या संविधानाने आपल्याला बळ दिले आहे. दिल्लीत सत्तेत असणारा राजा बनत नाही. नेताजींचा संदर्भ घेताना ओवैसी म्हणाले की, जय हिंद घोषणा देणारी व्यक्ती हैदराबादमधील मुस्लिम होती.
नोव्हेंबर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येत राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला होता. त्याचवेळी कोर्टाने सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत पाच एकर जमीन मशिदी बांधण्यासाठी देण्याचे आदेश दिले. यानंतर वक्फ बोर्डाला अयोध्याच्या धनीपूर गावात जमीन दिली गेली, जिथे मशीद तयार केली जात आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी याबाबत हे निवेदन दिले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे