मुंबई, ८ मार्च २०२३: सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. परंतू एका गोष्टीची खंतही वाटते. एवढा मोठा आपला महाराष्ट्र आणि जागतिक महिला दिनाच्या दिवशी एकही महिला मंत्रिमंडळात नसणं हे दुर्देव आहे. ते कमीपणाचं वाटतं. महाराष्ट्राच्या सरकारला ते शोभत नाही. मी अनेक वेळा जाहीर सभाच्यांवेळी, मीडियाच्यासमोर या गोष्टीचा उल्लेख केला आहे. सभागृहासमोर देखील हा मुद्दा उपस्थित केला आहे.
पण काय आडचण आहे हे मला कळायला मार्ग नाही. ही गोष्ट आम्हाला आणि तमाम महिला वर्गाला देखील पटत नाही, अशी खंत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (दि.८) माध्यमांसमोर व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक भागातील शेतकरी राजाच पीक त्यात आंबा, मका, गहू, ऊस, भाजीपाला यांच प्रचंड नुकसान झाले आहे. दौऱ्या दरम्यान काही लोकांनी त्यांच्या समस्या सांगितल्या.
आज राज्य अधिवेशनाचा दुसऱ्या आठवडातील पहिला दिवस आहे. आज आम्ही विरोधी पक्ष म्हणून अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे, त्याला उभा केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी करणार आहेत. शेतकरी खरोखरच अडचणीत आहेत. हतबल शेतकरी स्वतलाच मारुन घेत आहे. सरकार होळी आणि धुलिवंदन मध्ये गुंतलेले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत आणि नुकसान भरपाई देण्यासाठी पुढे आले पाहिजे, असेही पवार यांनी म्हटले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर