भारताच्या अर्ध्या भागात १ ते ३ डिग्री सेल्सियस पर्यंत घसरणार, हवामान खात्याचा अलर्ट

नवी दिल्ली, २२ डिसेंबर २०२०: भारतातील बहुतांश भागात सध्या जोरदार थंडी जाणवत आहे. उत्तर भारतातील बरीच राज्ये कोल्ड वेव्हच्या चपळ्यात आहेत. दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश अशा अनेक ठिकाणी किमान तापमान ५ अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले गेले आहे. दरम्यान, वाढत्या थंडीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

हवामान विभाग (आयएमडी) च्या मते वेस्टर्न डिस्टर्बेंस मुळे जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशच्या उच्च उंचीच्या भागात हलकी ते मध्यम बर्फवृष्टी होईल. ज्यामुळे मैदानी भागात शीतलहरीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या मते, पुढील तीन दिवसांत भारतातील जवळपास निम्म्या भागात तापमानात १ ते ३ अंशांची घसरण होऊ शकते.

पूर्व उत्तर प्रदेश, गुजरात, तेलंगणा, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये येत्या तीन दिवसांत थंडीची लाट तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिली.

दिल्लीतील तापमान ३ अंशांच्या खाली जाण्याची शक्यता

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मंगळवारी सांगितले की, दिल्लीत थंडीची लाट आल्याने किमान तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जाऊ शकते. तसेच या काळात दाट धुके येण्याची शक्यता आहे. २३ डिसेंबर ते २६ डिसेंबर दरम्यान दिल्लीत थंडीची लाट येणार असल्याचे विभागाने वर्तवले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा