राज्यातल्या या जिल्ह्यांत पुढील पाच दिवसात होणार पाऊस, हवामान खात्याकडून इशारा

मुंबई, 18 जून 2022: यंदा महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडला आहे. त्यामुळं राज्यात पेरणीची कामं देखील लांबणीवर पडली आहेत. गेल्या काही दिवसात राज्यात काही ठिकाणी पावसाने थोड्याफार प्रमाणात हजेरी लावली. पण बऱ्याच भागात पाऊस पडलेला नाही. आता हवामान खात्याने राज्यात पुढील 5 दिवसात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या दोन दिवसांमध्ये महत्त्वाच्या शहरांमध्ये वादळी वाऱ्याची शक्यता असून त्यानंतरच्या 3 दिवसांतही राज्यातल्या काही भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पावसासाठी सध्या पाऊस पोषक वातावरण असून यामुळे चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. पश्चिम महाराष्ट्रासह घाट विभागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला तर मुंबईलाही विकेन्डसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड अशा आदी भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे या जिल्ह्यांमधील घाट परिसरातही पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सखल भागात आणि शहरी भागात पूर येणे, रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत होणे, रस्ते, रेल्वे, हवाई आणि नौका वाहतुकीला अडथळा आणि अधूनमधून 40-50 पर्यंत वेग असलेले सोसाट्याचे वारे. तर किनार्‍याजवळ ताशी 60 किमी वेगाने वारे वाहत आहे, परिणामी असुरक्षित/तात्पुरत्या संरचनेचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा