इटलीत कोरोना व्हायरसमुळे ३६६ जणांचा मृत्यू

इटली : सध्या कोरोना व्हायरसनं जगातल्या बहुतांश देशात धुमाकूळ घातला आहे.  चीननंतर आता इटलीत कोरोना व्हायरसच्या बळींची संख्या एका दिवसात १३३ वरून ३६६ झाल्याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे.
याबाबत नागरी संरक्षण यंत्रणेच्या माहितीनुसार, संसर्ग झालेल्यांची संख्याही २५ टक्क्यांनी वाढून ५, ८८३ वरुन ७,३७५ वर गेलीय.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर इटलीनं उपाय योजनात्मक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. इटलीतल्या लोंबार्दिया प्रांतासह १४ प्रांतांना प्रवासासाठी परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसेच आता देशांतर्गत प्रवास करण्यावर निर्बंध घालण्यात आहेत.
जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग आतापर्यंत १ लाख ७ हजार लोकांना झाला असून, मृतांची संख्या ३६०० वर पोहोचली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा