सीमेवर लढणाऱ्या जवानांना लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती देशातच करावी – रोहित पवार

बारामती, १२ ऑक्टोबर २०२०: ‘सीमेवर लढणाऱ्या जवानांना लागणारे उबदार कपडे आपल्याला आयात करावे लागतात. पण ही आयात आपण आणखी किती दिवस करत राहणार? जवानांना लागणाऱ्या वस्तू या आपणच बनवल्या पाहिजेत. आयात थांबवून आपण आत्मनिर्भर झालं पाहिजे,’ असं वक्तव्य लष्कर उपप्रमुख ले. जनरल एस. के. सैनी यांनी नुकतंच केलं होतं. याच वक्तव्याचा आधार घेत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारला एक कल्पना सुचवली आहे.

“लडाखमध्ये चीन सीमेवर शत्रूशी लढताना आपल्या वीर जवानांना प्रतिकूल परिस्थितीमुळं निसर्गाशीही दोन हात करावे लागत आहेत. आपले वीर भारतभूमीचं अहोरात्र संरक्षण करत आहेत. या पार्श्वभूमीवर लष्कर उपप्रमुख ले. जनरल एस. के. सैनी यांनी जवानांसाठी आवश्यक असलेल्या उबदार कापड्यांबाबत वाचले आहे. सीमेवर आपले जवान हाडं गोठवणाऱ्या थंडीत काम करतात त्यांना उबदार कपडे आपल्याला बाहेरून आणावे लागतात. जवानांना लागणाऱ्या वस्तू या आपणच बनवल्या पाहिजेत.

आयात थांबवून आपण आत्मनिर्भर झालं पाहिजे असे पवार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिलाच आहे, त्याची सुरुवात जवानांसाठी लागणाऱ्या साहित्यापासून करायला हरकत नाही. आणि फक्त आत्मनिर्भर होऊनच भागणार नाही तर या साहित्याचा दर्जाच एवढा उत्तम असेल की आपण त्याची निर्यातही करू असे रोहित पवार म्हणाले.

न्युज अन कट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा