ठरलं… महेंद्रसिंग धोनी आयपीएल २०२३ मध्ये असणार चेन्नई संघाचा कर्णधार

MS Dhoni CSK Captaincy in IPL, ४ सप्टेंबर २०२२: माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येतेय. दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळत आहे. अशा स्थितीत धोनी पुढच्या सत्रातही खेळणार की नाही, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात घोळत असंल.

धोनी पुढच्या २०२३ च्या आयपीएल हंगामात खेळला तरीही चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचा कर्णधार असेल की नाही? मात्र आता याचा खुलासा झाला आहे. पुढील हंगामातही धोनी कर्णधारपद भूषवताना दिसणार असल्याचे चेन्नई फ्रँचायझीने स्पष्ट केलं आहे.

चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं की, ‘महेंद्रसिंग धोनी पुढील आयपीएल हंगामात चेन्नई संघाचा कर्णधार असंल. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या मोसमात रवींद्र जडेजाकडं कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं.

वास्तविक, आयपीएल २००८ पासून सुरू झाले. धोनी पहिल्या सत्रापासून चेन्नई संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे आणि त्याने संघाला सर्वाधिक ४ वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. गेल्या म्हणजेच आयपीएल २०२२ च्या मोसमात चेन्नई फ्रँचायझीने काही बदल केले होते. त्यांनी प्रथमच धोनीला कर्णधारपदावरून हटवलं. धोनीने स्वत: रवींद्र जडेजाकडं कर्णधारपद सोपवलं. मात्र संघाची कामगिरी खराब झाली.

खराब कामगिरीनंतर जडेजाने कर्णधारपद अर्धवट सोडलं

जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने सुरुवातीच्या ८ पैकी फक्त २ सामने जिंकले. त्याचवेळी जडेजाच्या कामगिरीवरही परिणाम होत होता. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत तो फ्लॉप दिसत होता. त्यानंतर स्वतः जडेजाने कर्णधारपदाचा राजीनामा देत पुन्हा धोनीकडं नेतृत्व सोपवलं. त्यानंतर चेन्नईचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकला नाही.

अशा परिस्थितीत ४१ वर्षांचा धोनी पुन्हा मैदानात खेळताना दिसणार की नाही, अशी अटकळ बांधली जात होती. असं मानलं जात होतं की पुढील आयपीएल हंगामात चेन्नई संघाचा नवा कर्णधार येऊ शकतो, जेणेकरून धोनीनंतर त्याचा वारसदार भविष्यात तयार होऊ शकंल. पण आता धोनी पदभार स्वीकारताना दिसणार असल्याचं फ्रँचायझीने स्पष्ट केलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा