जेसीबीच्या सहाय्याने बैलाची हत्या ; दोघांवर गुन्हा

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील पोंदेवाडी येथे दोघांनी जेसीबीच्या सहाय्याने बैलाची हत्या केली होती. शिवाय या घटनेचा त्या दोघांनी व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकलाही होता. किती अमानुषरित्या त्या बैलाची हत्या केली. ज्यावेळी हा व्हिडीओ पुण्यातील इंदापूर तालुक्यातीळ असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील पोंदवडी येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिगवण पोलिसांनी गोट्या उर्फ रोहित शिवाजी आटोळे आणि भाऊसाहेब अण्णा खारतोडे या दोघांवर प्राण्यांना क्रूरतेने वागवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या 27 ऑक्टोबरला या दोघांनी जेसीबीच्या सहाय्याने पिसाळलेल्या बैलाला निर्घृणपणे ठार केले.
पिसाळलेल्या बैलाची जेसीबीच्या सहाय्याने निर्घृण हत्या केल्याचा एक व्हिडीओ मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होता.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा