चीनी सरकारवर टीका केल्याबद्दल जॅक मा यांना अटक? चिनी माध्यमांचे वृत्त

बीजिंग, ६ जानेवारी २०२१: चीन सरकारवर टीका करणारे अलिबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा यांना अटक केल्याची किंवा नजर कैदेत ठेवल्याच्या शंकेत वाढ झाली आहे. सुमारे दोन महिन्यापासून ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होताना दिसले नाहीत. चिनी माध्यमांच्या वृत्तानुसार जॅक मा सरकारी एजन्सीच्या नजरकैदेत आहेत.

देखरेखीखाली चालू आहे व्यवसाय

जॅक मा चीनमधील कोट्यावधी संपत्ती असलेले व्यवसायिक आहेत ज्यांचा समावेश जगातील शंभर श्रीमंतांमध्ये देखील केला जातो. ते चीनच्या अलिबाबा ग्रुपचे संस्थापक आहेत. हाँगकाँगच्या एशिया टाईम्सच्या वृत्तानुसार जॅक मा यांना ‘नजरकैदेचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे चीनमधील बडय़ा व्यक्तींना अटक करण्याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती जाहीर करणे सरकार टाळत आहे, म्हणूनच असे दिसते की ‘पाळत ठेवणे’ म्हणजेच जॅक मा तुरूंगात जाणे असा अर्थ लावला जात आहे.

सरकारच्या विरोधात गेल्याने नुकसान

विशेष म्हणजे, चिनी अब्जाधीश व्यावसायिक, ई-कॉमर्स कंपनी अलिबाबा आणि अँट ग्रुपचे संस्थापक जॅक मा,, गेल्या दोन महिन्यांपासून सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. अलीकडच्या काळात चिनी सरकारच्या धोरणांवर त्यांनी टीका केली होती, त्यानंतर त्यांच्या कंपन्यांवर कठोर कारवाई केली गेली.

अशाप्रकारे जॅक मा यांच्या गायब झाल्यानंतर अनेक प्रकारच्या शंकादेखील व्यक्त केल्या जात आहेत. वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, नुकतेच ते आफ्रिकेतल्या आपल्या कंपनीच्या एका कार्यक्रमात, ‘आफ्रिका बिझिनेस हिरोज्स’ दिसले नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा