जाधववाडीत चोरांनी घरांची कुलपे तोडून साड्यांवर मारला डल्ला

आंबेगाव-जाधववाडी (रांजणी): रविवारी (दि.१२)रोजी रात्री दोन ते तीनच्या सुमारास बंद घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी तीन ठिकाणी साड्यांवर डल्ला मारला. सुंदर मळा या परिसरात एका ठिकाणी चोरट्यांनी चोरी केली आहे. नंदा अबू जाधव यांच्या घरातील चार हजार पाचशे रुपये रोख तीन पैठणी पायातील पैंजण आधार कार्ड पॅनकार्ड चोरट्यांनी चोरून नेले असून, संतोष नानाभाऊ जाधव यांच्या बंद घरातून कपाटातील नवीन वीस ते पंचवीस साड्या चोरट्यांनी चोरून घरातील सामानाची उचकापाचक केली आहे
सावकार भागा जाधव यांच्या घराची कौले काढून चोरट्यांनी घरात उतरण्याचा प्रयत्न केला असता याच्यातून फळ्या असल्याने त्यांना आत उतरता आले नाही. सुंदर मळ्यातील नवनाथ बाबुराव गायकवाड यांच्या घराचे ग्रिल कापून घरातील सामानाचे उचकापाचक करून त्यांना काही न मिळाल्याने चोरट्यांनी घराची नासधूस करून पळून गेले आहेत.
याबाबत पोलीस पाटील योगेश जाधव यांनी मंचर पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलीस उपनिरीक्षक राहुल लाड पोलीस नाईक राजेंद्र हिले व गणपत डावखर यांनी पंचनामा केला आहे. या परिसरात एक संशयित मोटार सायकल आढळल्याने पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याआधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा