जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?

51

सध्या देशात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्याचा खातमा झाल्यानंतर आता जगावर युद्धाचे ढग दाटून आल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे सर्व वातावरणाच्या सर्वात जास्त झळा भारताला बसणार असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

अमेरिकेनं केलेल्या इराणवर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला आणि अवघं जग तिसऱ्या महायुद्धाच्या वणव्याकडे वाटचाल करतंय की काय, अशी चर्चा सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. कारण त्याच कारणही तसेच आहे. कारण या हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेणार असं जाहीर केल आहे. तर अमेरिका आपले ३ हजार सैनिक आखात देशात पाठवणार असल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे. त्यामुळे लवकरच आखातात तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडू शकतो अशी परिस्थिती निर्माण होऊ लागल्याने पहायला मिळत आहे. जर हे तिसरे महायुद्ध भडकले तर याच फटका संपूर्ण जगाला सहन करावा लागणार आहे. अशा घडामोडी सध्या घडत आहेत.
अशा युद्धजन्य स्थितीचा सर्वाधिक फटका भारतालाच बसणार आहे. हा फटका इतका मोठा असेल की सामान्य भारतीयांचं यात मोठं नुकसान होणार आहे.
कारण अमेरिकेच्या एअर स्ट्राईकबरोबरच खनिज तेलाच्या किमतीत जवळपास ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल ५ ते ६ रुपयांनी महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅसही महागण्याची शक्यता आहे. इंधनाचे दर वाढले की वाहतुकीचे दर वाढणार आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तूही महागतात हे दुष्टचक्र आहे. सोन्याच्या भावाची घोडदौड पाहता लवकरच ते ५० हजार रुपये तोळा होणार असून रुपयाची किंमतही दिवसेंदिवस घटत चालल्याचे चित्र आहे. सध्या डॉलरची किंमत ७१.८९ रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे जगभरातले शेअरबाजारही घसरत चालले आहेत. त्याचाही परिणाम भारतावर होताना दिसत आहे.
युद्ध ही केवळ काही ठराविक लोकांच्या फायद्यासाठीच योग्य ठरतात. मात्र त्याचे चटके सर्व सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सहन करावे लागतात. त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीला योग्य वेळी आवर घालणे गरजेचे आहे. नाही तर येणारा काळ अतिशय भयानक असेल. अशी परिस्थिती सध्याची निर्माण होऊ लागली आहे.

 

                                                                                                        -प्रशांत श्रीमंदिलकर