बारामती १९ जून २०२३ : बारामती येथील शारदा प्रांगण मैदानावरून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा इंदापूर तालुक्यातील सणसर येथील मुक्कामासाठी रवाना झाला वारकऱ्यांनी हातात पताका डोक्यावरती तुळशी वृंदावन घेत ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली म्हणत पंढरीच्या दिशेने विठ्ठलाच्या भक्तीसाठी धावा केला तत्पूर्वी दुपारच्या विसाव्यासाठी ही पालखी बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे विसावली यावेळी बारामती, फलटण, इंदापूर, माळशिरस तालुक्यातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
दुपारी काटेवाडी येथील विश्रांती झाल्यानंतर पालखी सोहळा रवाना होण्यापूर्वी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीला काटेवाडीत मेंढरांचे गोल रिंगण पाहायला मिळाले सर्व भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे हे रिंगण पाहायला मिळाले प्राण्यांमध्येही भक्तीचा रस अनुभवायला मिळाला लाखो भाविकांनी मेंढरांचे गोल रिंगण पाहताना विठ्ठलाचा गजर व श्री संत ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली म्हणत जयघोष केला.
बारामती इंदापूर मार्गावरील बारामती पिंपळी, काटेवाडी या गावात पालखीचे विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले वारकऱ्यांसाठी भोजन अन्नदान नाश्त्याची सोय विविध मंडळाच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती. ठीक साडेचार वाजता ही पालखी इंदापूर तालुक्यात प्रवेश करेल इंदापूर तालुक्यात प्रवेश करताना भवानीनगर येथील सर्व राजकीय पक्षांच्या वतीने तसेच ग्रामपंचायतच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले त्यानंतर पालखी सोहळा सणसर कडे मुक्कामासाठी रवाना झाला सणसर ग्रामपंचायत व भवानीनगर पोलीस स्टेशनच्या वतीने शासकीय स्वागत करण्यात आले.
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात स्वच्छतेचा संदेश देणारे , पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी सायकल वारी, महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर असणाऱ्या तुळशीवृंदावन, फुगडी, भगवे पताका व विठ्ठलाचा गजर करत ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली म्हणत विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर झालेले लाखो भक्तजन व लाखो ग्रामस्थ या पालखीच्या माध्यमातून भक्ती रसात चिंब होताना दिसत होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार