अहमदाबाद- मोटेरामध्ये जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे काम जानेवारी 2020 पर्यंत पूर्ण होईल. गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत येणाऱ्या या स्टेडियमचे 90% काम पूर्ण झाले आहे. या स्टेडियमला बनवण्यासाठी आतापर्यंत 700 कोटी रुपये खर्च झाले आहेत. या स्टेडियममध्ये 1.10 लाख दर्शक बसण्याची क्षमता असल्यामुळे हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम असेल.
जीसीएच्या या स्टेडियममधील प्रत्येक स्टँडमध्ये फूड कोर्ट आणि हॉस्पिटेलिटी एरिया तयार करण्यात आला आहे. त्याशिवाय क्रिकेट अकॅडमीदेखील बनवण्यात आली आहे. हे स्टेडियम भारतातील पहिले असे स्टेडियम आहे, ज्यात फील्ड ऑफ प्ले एलईडी लाइट्सची सुविधा असेल. त्याशिवाय स्टेडियममध्ये अत्यंत आधुनिक पवेलियन आणि हायटेक मीडिया बॉक्स तयार केले आहेत. स्टेडियमची मुख्य पिच ब्लॅक आणि रेड सॉइलच्या कॉम्बीनेशनमध्ये बनवली आहे, तर सर्व प्रॅक्टिस पिच इंडोर राहतील.
स्टेडियममध्ये या सुविधा ब्लेड-रेड सॉइल पिच 55 रूम, इंडोर आउट डोर गेम 10 हजार टू-व्हीलर पार्किंग 75 एसी कॉर्पोरेट बॉक्स फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, टेनिस अकॅडमी देखील बनेल