कर्जत, दि. ९ जून २०२०: कर्जत शहरातील मोठे आणि प्रसिद्ध जगंदबा फर्नीचर दुकानामध्ये चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी सापळा रचून चोराला पकडले आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , ४ जून रोजी रात्री बाराच्या सुमारास कर्जत मधील कुळधरण रोड वरील जगंदबा फर्नीचर या दुकानातील सहा चोरट्यांनी पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील टिव्ही, इलेक्ट्रॉनिक उपकरणे असा लाखोंचा ऐवज चोरीला केला.
दुकानातील सीसीटिव्हीवरून सहा चोरांनी ही चोरी केल्याचे दिसुन येत होते. या प्रकरणी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केले. या प्रकरणी अक्षय ताराचंद पवार, अक्षय महिंद्र काळे, दोघे राहाणार बारडगाव सुद्रीक तालुका कर्जत यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या दोघांना १२ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष











































