जागतिक कुपोषण यादीत भारताचे स्थान घसरत चालले आहे ?

जागतिक कुपोषण यादी नुकतीच जाहीर करण्यात आले आहे. ही यादी कन्सर्न वर्ल्ड वाइड आणि वेल्ट हंगर फाईलफ या दोन संघटना मिळून तयार करतात. या संघटना पूर्ण जागतिक स्तरावर माहिती गोळा करतात आणि चार महत्वाच्या मानांकनावर जगातील सर्व देशांचे या यादीतील स्थान निश्चित करतात. भारताचे स्थान या यादीत बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्याही पेक्षा खाली आले आहे. ही यादी एकूण ११७ देशांतील अहिती गोळा करून तयार करण्यात आली आहे.या यादीत भारताचे स्थान खूप खाली आहे. आत्ताच्या आलेल्या यादीनुसार भारत १०२ क्रमांकावर आहे. २०१३ पासून या यादीतील भारताचे स्थान घसरत चालले आहे.
२०१३ मध्ये भारताचे स्थान ६३ वे होते,
२०१४ मध्ये ५५ वे,
२०१५ मध्ये ८० वे,
२०१६ मध्ये ९७ वे,
२०१७ मध्ये १०० वे,
२०१८ मध्ये १०३ वे होते
आणि या वर्षी हे स्थान १०२ आहे. आपण बघितले तर मागील ५ वर्षात भारताचे स्थान सातत्याने घसरत चालले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा