जयपूर बॉम्बस्फोटातील चारही आरोपींना फाशीची शिक्षा

नवी दिल्ली : जयपूर शहरात २००८ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील चारही आरोपींना विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे.
सैफुर रेहमान, सरवर आझमी, मोहम्मद सैफ आणि सलमान अशी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणातील पाचवा आरोपी शाहबाज हुसेनची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
२००८साली जयपूरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांत ८० निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता तर १७६ जण जखमी झाले होते.
या प्रकरणातील २ आरोपींना दिल्लीतील बाटला हाऊस येथे झालेल्या चकमकीत ठार मारण्यात आले होते, तर ४ आरोपींना १८ डिसेंबर रोजी जयपूरच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. या चारही आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. गेल्या ११ वर्षांपासून हा खटला प्रलंबित होता.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा