जैववैद्यकीय घनकचऱ्याची विल्हेवाट लावा: जिल्हाधिकारी

जालना, दि.३१ मे २०२० : जिल्हयातील सर्व खासगी तसेच शासकीय, निमशासकीय संस्था पॅथलॅब, आयुर्वेद, युनानी होमीयोपॅथीक, अॅलोपॅथी, दंत इत्यादी रुग्ण सेवेतून आंतर व बाहयरुग्ण विभागातून निर्माण होणारा जैववैद्यकीय घनकचऱ्याची विल्हेवाट जैव वैद्यकीय (व्यवस्थापन व हाताळणी) कचरा नियम, २०१६ प्रमाणे करणे आवश्यक असून जिल्ह्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नेमून दिलेली संस्था कार्यरत आहे.

सदर संस्था केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करुन जैव वैद्यकीय कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावते.

सर्व वैद्यकिय संस्थानी या संस्थेमार्फत किंवा इतर विहित पध्दतीने जैव वैद्यकिय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची संपूर्ण व्यवस्था करावी. त्याचबरोबर वापरण्यात आलेल्या मास्कचीही विल्हेवाट योग्य पद्धतीने करण्यात यावी.

यासाठी अंतिम १५ दिवसांची मुदत देण्यात येत आहे. यानंतर याप्रमाणे उपाययोजना न केल्यास आपणाविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा