जलालपूर येथे जनता कर्फ्यू

कर्जत, दि. २४ मे २०२०: कर्जत तालुक्यात गेली दोन ते तीन दिवस कोरोना विषयी वातावरण हे अतिशय भयंकर झालेले पाहण्यास मिळत आहे. राशिन या ठिकाणी कोरोनाचा तालुक्यातील पहिलाच रूग्ण सापडला होता. त्यामुळे कर्जत तालुक्यातील वातावरण हे चांगलेच तापलेले दिसत आहे. प्रशासनाने आपले हात पाय जोराने चालवण्यास सुरूवात केली आहे.

जलालपूर गावाच्या शेजारीच तीन किलोमीटर वर सिध्दटेक या गावात कोरोनाचा संशयित रूग्ण सापडलेला असताना सिध्दटेक मधील वातावरण हे अतिशय गंभीर झाले आहे. जलालपूर पासुन राशिन हे अंतर अवघे सोळा किलोमीटरच आहे. जलालपूर या गावात शनिवारचा आठवडे बाजार भरत असल्याने तो ही ताळेबंदीमुळे बंदच असतो, पण या दिवशी भाजी-पाला तरकारींचे येणे टाळण्यासाठी गावातील कोरोना समितीने नागरिकांच्या संमतीने शनिवार जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

जलालपूर येथे कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शनिवार जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. कर्फ्यूला गावातील नागरिकांना चांगल्या प्रकारे सहकार्य केले. गावातील किराणा दुकाने, कापड दुकाने, कृषी सेवा केंद्र, शेती साहाय दुकाने ही बंद करण्यात आली होती. गावातील फक्त मेडिकल आणि दवाखाना चालू ठेवण्यात आले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा