गोल पोस्ट जळगाव जळगावमध्ये माजी महापौरच्या फॉर्म हाऊसवर बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; सात जणांना पाच...

जळगावमध्ये माजी महापौरच्या फॉर्म हाऊसवर बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; सात जणांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

जळगावमध्ये माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फॉर्म हाऊसवर पोलिसांनी बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निकटवर्तीय मानले जाणारे ललित कोल्हे यांच्या मालकीच्या एल.के. फॉर्म हाऊसवर २८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता छापा टाकण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईत सात जणांना ताब्यात घेतले गेले असून, त्यांच्या ताब्यातून ३१ लॅपटॉप, सात मोबाईल, एक फ्रिज, काही डेबिट कार्ड आणि दोन हुक्का सेट जप्त करण्यात आले आहेत.

या बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिका आणि कॅनडा येथील नागरिकांना फोन करून ‘ॲमेझॉन कस्टमर केअर’ असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक केली जात होती. संशयित आरोपी देशी-विदेशी लोकांना कॉल करून प्राप्त झालेले पैसे भारतात आणत असल्याचे पोलिस तपासात समोर आले. या प्रकरणात राकेश चंदू आगारिया, नरेंद्र चंदु आगारिया, आदिल सैय्यद निशास, इम्रान अकबर खान, अकबर, ऋषी, मोहम्मद जिशान नुरी मोहम्मद नुर आलम, शाहबाज आलम, साकीब आलम, मोहम्मद हाशिर अशी ११ जणांची नावे आहेत.

२९ सप्टेंबर रोजी दुपारी सात जणांना जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले, जिथे न्यायालयाने त्यांना ४ ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई जळगाव जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मानली जात आहे आणि बोगस कॉल सेंटरच्या विरोधातील पोलिसांची तज्ज्ञ कारवाई म्हणून गौरवली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version