गोल पोस्ट महाराष्ट्र जालना गुन्हे शाखेने राणी उंचेगाव येथे तलवार बाळगळणाऱ्यास पकडले

जालना गुन्हे शाखेने राणी उंचेगाव येथे तलवार बाळगळणाऱ्यास पकडले

जालना ९ मार्च २०२४ : जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जालना जिल्ह्यात अवैद्य शस्त्र बाळगणार्यांविरुध्द मोहीम सुरु केलीय. या मोहिमेंतर्गत राणी उंचेगाव येथे तलवार बाळगळणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलंय.

गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहिती नुसार जालना जिल्ह्यातील राणी उंचेगावं येथे ईश्वर नामदेव जाधव हा लोखंडी तलवार बाळगत असल्याची माहिती मिळताच, स्थानीक गुन्हे शाखेचे कर्मचारी देविदास भोजने, विनायक कोकणे, लक्ष्मीकांत आडेप, भागवत खरात, सौरव मुळे यांनी छापा घालून तलवार जप्त केली. संशयित आणि जप्त मुद्देमाल अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. अधिक तपास अंबड पोलीस करीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : श्रीधर कापसे

error: Content is protected !!
Exit mobile version