जालना गुन्हे शाखेचे निरीक्षक रामेश्वर खणाळ यांची लातूरमधील पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली

जालना १ जुलै २०२४ : जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांची लातूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आलीय. पोलिस निरीक्षक रामेश्वर खणाल यांचा छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांची बदली करण्यात आलीय. त्यांना स्थानिक गुन्हे शाखेत जेमतेम वर्षभरही काम करण्याची संधी मिळालेली नाही. खनाल यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळेल, अशी चर्चा जोर धरत असतांनाच, आज महासंचालकांनी परिक्षेत्राचा कार्यकाळ संपलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यात खनाळ यांच्या बदलीचा समावेश आहे.

दरम्यान जिल्ह्यात नव्याने काही पोलीस निरीक्षक बदलून येत आहेत. जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असलेले उपअधीक्षक किरण बिडवे यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदाचे किरण बिडवे हे प्रबळ दावेदार समजले जात आहेत.

यापूर्वी जेंव्हा-जेंव्हा एलसीबीच्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या त्यानंतर त्याठिकाणी कोण बदलून येणार..? यावर बिडवे यांचेच अनेकदा नाव पुढे आले होते. यावेळी मात्र किरण बिडवे हे नक्कीच एलसीबीची सूत्रे हाती घेतील, अशी खात्रीलायक चर्चा आहे.

न्यूज अनकट प्रतिनीधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा