जालना जिल्ह्यात दोन नद्यांना पूर ; एकजण गेला वाहून

41

जालना: जालना जिल्हयातील भोकरदन तालुक्यातील केळणा आणि रायघोळ या दोन नद्यांना परतीच्या पावसाने पूर आला आहे. या पुरामध्ये या परिरातील गजानन खराटे नावाची व्यक्ती वाहून गेल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली.
जालना जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसाने या नद्यांना पूर येऊन नद्यांनी पाण्याची पातळी ओलांडली. याचा मोठा फटका नदी काठी असणाऱ्या गावांना बसला आहे.त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा