गोल पोस्ट गुन्हा जालना जिल्ह्यात दारुबंदी पथकाची चंदनझिऱ्यात कारवाई

जालना जिल्ह्यात दारुबंदी पथकाची चंदनझिऱ्यात कारवाई

जालना, दि.२९ मे २०२०: जालना जिल्ह्यातील चंदनझिरा परिसरातील लालूप्रसाद सुदाम जाधव आणि त्याच्या पत्नीच्या मालकीच्या अवैध गावठी दारूच्या अड्ड्यावर दारूबंदी विशेष पथकाने आज ( शुक्रवारी) सकाळी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

यावेळी गावठी दारूच्या अड्ड्याची व घराची झाडाझडती घेत असताना त्याठिकाणी दोन तलवारी आढळून आल्या. या धारदार तलवारीसह सुमारे ५७ हजार ५०० रुपयांची गावठी दारू व रसायन जप्त करण्यात आले.

पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संपत पवार, पोलीस कर्मचारी धनाजी कावळे, रामेश्वर बघाटे, सुभाष पवार, सुरेश राठोड, राजेंद्र वेलदोडे, राम पव्हरे, यशवंत मुंढे, परमेश्वर धुमाळ, किशोर जाधव, सर्जेराव हिवाळे, अलका केंद्रे, रत्नमाला एडके, चालक दीपक अंभोरे यांनी ही कारवाई केली.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version