जालना जिल्ह्यात सिंचन प्रकल्पातील गाळ शेतकऱ्यांनी स्व-खर्चाने काढावा: जिल्हाधिकारी

जालना, दि.२७ मे २०२०: सध्या उन्हाळ्याच्या कालावधीत शेतीमधील मशागतीचे कामे जोरदारपणे सुरु आहेत. तसेच जालना जिल्ह्यातील बरेचशे प्रकल्प, सिंचन तलाव, साठवण तलावातील पाणीसाठी कमी झालेला आहे. त्यामुळे बऱ्याचशा तलावात मोठ्या प्रमाणात गाळ मिळू शकतो. या गाळाचा वापर शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी केल्यास शेत जमिनीची प्रत सुधारुन शेत जमिनीची सुपिकता वाढुन शेती उत्पन्नात वाढ होईल .

त्यामुळे सर्व संबंधित शेतकऱ्यांनी तलावात उपलब्ध असलेला गाळ शेतीसाठी स्वखर्चाने काढणार असतील तर त्यासाठी तातडीने नियोजन करावे. तसेच शेतकरी स्वखर्चाने गाळ घेऊन जाण्यास तयार असतील त्यांनी संबंधित तहसिलदार, सिंचन विभागाच्या कार्यालयाकडे संपर्क करुन रितसर परवानगी घेऊन गाळ काढुन घेण्याचे काम सुरू करावे असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.

सध्या जालना जिल्ह्यात जलसंपदा विभागाचे एकुण ४७, प्रकल्प व जलसंधारण विभागाचा एक लघुपाटबंधारे तलाव व १३ साठवण तलाव, जिल्हा परिषद विभागाकडील १४ सिंचन तलाव आहेत.

त्यापैकी ज्या तलावात अत्यल्प पाणीसाठा आहे किंवा जे प्रकल्प कोरडे आहेत. त्यामधील गाळ काढण्याचे काम त्वरित संबंधित तलावाचे शाखाधिकारी व उप विभागीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली करण्यात यावे. त्यानंतर ज्या प्रमाणात गाळ काढण्यासाठी बुडीतक्षेत्र उपलब्ध हेाईल, त्याप्रमाणे सर्व कामे सुरु होतील, याची दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा