गोल पोस्ट महाराष्ट्र जालना पोलीसांची धाडसी कारवाई सहा अवैध पिस्टल जप्त

जालना पोलीसांची धाडसी कारवाई सहा अवैध पिस्टल जप्त

जालना १८ डिसेंबर २०२३ : जालन्यात गेल्या काही दिवसांपूर्वी दिवसा ढवळ्या गोळ्या झाडुन एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. शहर आणि परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पोलीस खात्यावर टीका होऊ लागली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध मोहीम राबवुन आशिष चव्हाण, राहुल बाबुराव पवार, चरण रायमल, किरण भोसले, गणेश यज्ञेकर आणि संदीप यज्ञेकर या सहा जणांना अटक करुन त्यांच्याकडुन सहा पिस्टल, बारा जिवंत काडतुस आणि एक तलवार असा साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

जालन्यात पिस्टल विक्री करणार्‍या गुन्हेगाराला यापुर्वीच अटक करण्यात आली असुन त्याने दिलेल्या माहीतीवरुन आरोपींपर्यंत पोहचण्यास पोलिसांना यश आल्याची माहीती पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी पञकार परिषदेत दिली. या प्रकरणी उत्कृष्ट कामगिरी केल्याने पोलीस अधिक्षकांनी पंधरा हजार रुपयांचा रिवार्ड जाहीर केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : संजय आहेर

error: Content is protected !!
Exit mobile version