गोल पोस्ट महाराष्ट्र उदगीर येथील रोटी कपडा बँक, शहरी बेघर निवारा केंद्र यांना राज्यस्तरीय समाजसेवा...

उदगीर येथील रोटी कपडा बँक, शहरी बेघर निवारा केंद्र यांना राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार प्रदान

उदगीर १८ डिसेंबर २०२३ : कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा स्वतःच्या परिवारातील मृत व्यक्तींना स्वतःच्या मुलाबाळांनी नाकारले, त्या मृत व्यक्तींचा जाती धर्माचा भेदभाव न करता त्या त्या धर्म पद्धतीने अंत्यसंस्कार ज्या समाजसेवकांनी केले त्यांची दखल अवघ्या देशाने घेतली. रोटी कपडा बँक, शहरी बेघर निवारा केंद्र उदगीर यांच्याकडून बेघर वंचित वृद्ध यांना तत्पर सेवा देण्याचे कार्य घडत आहे.

अन्नदान असेल, पूरग्रस्तांसाठी मदत असेल, बेवारस मृत लोकांचा अंत्यसंस्कार करणे इत्यादी अनेक गोष्टींच्या बाबतीत कार्य ज्यांनी चालू ठेवला आहे त्यांना मा. मधुकरराव एकुर्केकर मित्र मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार देण्यात आला. सदरील पुरस्कार जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर यांच्या शुभहस्ते देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य भदंत नागसेन बोधी होते. यावेळी रोटी कपडा बँक व शहरी बेघर निवारा केंद्राचे सिद्दिकी असद जमाल, खुर्शीद आलम, शेख गौस अहमद, शेख समीर, सिद्दिकी तह, शेख जावेद, नबीजी शाखेब, अब्दुल रहीम जावेद कादरी इत्यादी पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सुधाकर नाईक

error: Content is protected !!
Exit mobile version