जालना शहराला जोडणारा दिडशे वर्षापुर्वीचा लोखंडी पुल जमीनदोस्त

जालना, दि.२५ मे २०२०: जालना जिल्ह्याला जोडणारा दीडशे वर्षांपूर्वीचा कुंडलिका नदीवरील लोखंडी पूल प्रशासनाकडून अखेर पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या ठिकाणी आता नवीन पूल उभारण्यात येणार आहे.

रविवारपासुनच हा पूल पाडण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र हा पूल न पडता या नवीन पूल उभारण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती.

मात्र एकीकडे मस्जिद व एकीकडे मंमादेवी मंदिर असल्याने लोखंडी पुलाचे जतन करुन नवीन पुल उभारणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे नवीन पूल बांधणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.

सध्या हा लोखंडी पुल पाडण्यात आला असला तरी पालिका प्रशासन या पुलाचे अवशेष जपून ठेवले जाणार आहे, अशी माहिती आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली.

दीडशे वर्षांपासूनचा जुना पूल पडणार असल्याने जालनावासीयांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा