जालना ८ जानेवारी २०२४ : पुणे येथील राजाराम भिकू पठारे स्टेडियम खराडीत होणाऱ्या १३ व्या राज्य फिल्ड इनडोअर तिरंदाजी चॅम्पियन स्पर्धेसाठी जालन्याचा संघ आज रवाना झाला आहे. जालना जिल्ह्यातुन या स्पर्धेसाठी विविध वयोगटातील एकूण १८ धनुर्धारी निवडण्यात आले असून ते १० ते १८ मीटर रेंजवर खेळणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून आर्चरी म्हणजेच तिरंदाजी या क्रीडा प्रकाराकडे सर्वच वयोगटातील लोकांचा कल वाढला आहे. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जालन्यातील तिरंदाजांनी या आधी बाजी मारली आहे. जालन्यामधील जेईएस महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. हेमंत वर्मा यांच्याकडून धनुर्विद्येचे धडे गिरवणारे चिमुकले जिल्ह्याचा नावलौकिक वाढवतील अशी अपेक्षा करत जिल्हा फिल्ड आर्चरी संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सोनोने यांनी शुभेच्छा दिल्या.
न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी